Issue Description


Authors : एस. पी. राऊत

Page Nos : 245-248

Description :
विसावं शतक हे भारत वर्षात स्वातंत्र्याचे शतक म्हणुन ओळखले जावं. हया शतकाचा पूर्वार्ध हा राजकीय स्वातंत्र्याच्या प्रेरणेने प्रेरित झालेल्या संग्रामाचा होता, तर उत्तरार्ध हा सामाजिक स्वातंत्र्यासाठी झालेल्या अनेक चळवळींनी व्यापलेला होता. राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या कुशीत विसावं शतक विसावलं होत. जगाला हादरा देणारी महायुद्धे या शतकात झाली. वर्णव्यवस्था ईष्वर निर्मित आहे असे हिंदू धर्म ग्रंथाचे सुत्र आहे. यालाच आदर्ष समाज व्यवस्था म्हणून गौरविले गेले. हिंदू समाजात अतिशूद्राचं, भटक्या विमुक्त जमाती तसेच आदिवासी जमातीत तर वन्य पशू सारखे जीवन जगताना दिसतील. 19 शतकात अज्ञानाच्या अंधकःरात पडणारा दलित विसाव्या शतकात आत्मतेजाणे स्वयंप्रकाशित होतो याची कारणे शोधली पाहिजेत. (इस्लामचे आक्रमण, सती प्रथा, बालविवाह, महात्मा ज्योतिराव फुले 19 वे शतक प्रबोधनाचे युग महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर स्वातंत्र्योत्तर काळ आणि दलित) पहिल्या अर्धशतकातील दलितांची चळवळ ही आम्ही हिंदू आहोत आम्हाला इतर हिंदू प्रमाणे समान हक्क आणि अधिकार मिळाले पाहिजेत.

Date of Online: 30 Jan 2023