Special Issue Description


Authors : रचना धर्मदास वानखडे

Page Nos : 28-32

Description :
महिला सशक्तीकरणाशी संबंधीत सामाजिक, आर्थिक, राजनीतीक आणि कायदेविषयक विषयांवर नेहमीच संवेदनशीलता आणि आदर व्यक्त केला जातो. सशक्तीकरणाच्या प्रक्रियेत समाजाला पारंपारिक पितृसत्ताक दृष्टिकोनाला महत्व दिल्या जाते. ज्यामुळे महिलांना नेहमीच कमजोर केल्या जाते. जागतिक स्तरावर महिलावादी आंदोलने आणि युएनडीपी आदी आंतरराष्‍ट्रीय संस्थांनी महिलांना सामाजिक सत्ता, स्वतंत्रता आणि न्याय यांच्यामध्ये राजकीय अधिकार प्राप्त करण्याची महत्वाची भूमिका निभवली आहे. महिला सशक्तीकरण भौतिक, आध्यात्मिक, शारिरीक आणि मानसिक या सगळया स्तरांवर महिलांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. महिला सशक्तीकरणाला सोप्या शब्दात सांगायचे झाले तर महिला स्वतः शक्तीशाली बनतात आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात आणि परिवारात व समाजात चांगल्या प्रकारे राहू शकतात. समाजात त्यांना त्यांचे वास्तविक अधिकार प्राप्त करून देण्यासाठी त्यांना सक्षम बनविणे म्हणजे महिला सक्षमीकरण होय. महिलांमध्ये इतकी ताकद असते की, समाज व देशाला बदलवू शकते आणि समाजातील कोणत्याही समस्येला पुरूषांपेक्षा चांगल्या प्रकारे सोडवू शकते. महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारत सरकारने खुप योजना अंमलात आणल्या आहे. महिलांने श्रमदानात योगदान केल्यास भारताचा विकास दर 10 टक्के ने वाढू शकते असे विश्‍व बॅंक ने एका रिपोर्ट मध्ये मुद्दे मांडले होते.

Date of Online: 30 March 2022