Special Issue Description


Authors : डॉ. आर.यु. मुरमाडे

Page Nos : 37-39

Description :
स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्यात अनेक वाङ्मय प्रवाह निर्माण झाले. विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मातराचा तत्कालीन साहित्यावर फार मोठा प्रभाव पडलेला दिसतो. जो तो आपल्या भावनांना साहित्यापासून मोकळिकता देऊ लागला. आपल्या जीवन जाणिवा तो विविध साहित्यातून अभिव्यक्त करू लागला. कविता, कथा, कांदबरी, नाटक, आत्मचरित्र यामधून आपले भाव जीवन भोगलेले वास्तव अधोरेखित करू लागला. साठोत्तरीच्या दशकात स्त्रीवादीसाहित्याने स्वतःचे एक वेगळे अस्तित्व निर्माण केलेले आपणास दिसते. भारतीय समाजातील स्त्रीयांनीही लक्षणीय अशी आत्मकथने लिहिली आहेत. येथील हजारो वर्षाच्या संस्कृतीने स्त्रीला एक दासी म्हणून जे दास्यत्व तिच्या वाट्याला आले त्याचे‍ प्रतिबिंब साठोत्तरी साहित्यात विशेषतः स्त्रीवादी दलित आत्मकथेतून जाणवू लागले. आत्मकथा हा वाड्ःमय प्रकार सर्वस्पर्षी प्रत्येकाच्या जीवनाचा आणि आस्थेचा विशय आहे. विशेषतः स्त्रीवादी साहित्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा साठोत्तरीच्या दषकात स्त्रीवादी साहित्याने आत्मकथेतून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चारभिंतीच्या पलिकडचं जग तिने यातून चितारलेला आपल्याला दिसतो. हजारो वर्शाची परंपरागत पुरूषसत्ताक संस्कृती कुठेतरी शेाषणाच्या मुळाशी घाव घालते याचे विदारवास्तव स्त्रीवादी दलित आत्मकथेतून मांडली आहे.

Date of Online: 30 March 2022