Special Issue Description


Authors : अनुश्री माहुरकर

Page Nos : 38-40

Description :
अचानक संपूर्ण जगावर प्रहार केला व काही कळायच्या आतच संपूर्ण जग अस्ताव्यस्त होऊन गेल. त्यातून आपला देश सुध्दा सुटला नाही. भारतात केरळ राज्यात पहिला पेशंट आढळला व तिथूनच भारताला करोनाची चाहूल लागली. त्यातही आपले महाराष्ट्र राज्य करोना बाधीतांच्या संख्येत समोर आहे . ह्या भयानक परिस्थिमधील संकटाला पाहून आपल्या देश्यातील पंतप्रधान व राज्याच्या मुख्यमंत्री ह्यांनी मिळून एकमताने करोनावर उपाय शोधून काढला. करोना विषाणू संसर्गजन्य असल्यामळे त्याचा संसर्ग रोखण्यासाठी लाॅकडाऊन हा उपाय शोधून काढला. ह्यात सर्व बाजार दुकाने तसेच सर्व शाळा व महाविद्यालयही बंद करण्यात आले. शाळा सोडल्यातर महाविद्यालयांच्या ऐन परीक्षेच्या तोंडावर लाॅकडाऊन झाले व विद्यार्थ्यांचे उरलेल्या अभ्यासक्रम, असाईमेंट हे अर्धवट राहीले. संपूर्ण शिक्षणक्षेत्रा समोर हे पूर्ण करण्याच आव्हान समोर आल. तेव्हा अष्या परिस्थितीतही स्तब्ध न बसता विद्यार्थंना ई-लर्निंग अध्यापन देऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान न होऊ देण्याचा उत्तम उपाय शिक्षिणक्षेत्राने घेतला. हयात ज्यांना तंत्रज्ञानाचे ज्ञान त्यांना आधीपासूनच आहे त्यांना काही नवीन शीकून त्यांना आपल्या ध्यानात भर पाडण्याचा फायदा झाला. पण ज्यांना तंत्रज्ञानाबद्दल पुसटशी माहिती आहे त्यांना अथक प्रयत्न करावे लागले व त्यांचा मात्र तोटा झाला. एकं दरीत ई-लर्निंग अध्यापनाचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे ही आहेत . पण कोव्हिड सारख्या संकटातही तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान न होण्यासाठी ई-लर्निंग अध्यापन देऊन वेळेचा सदुपयोग करून विद्यार्थांच्या ज्ञानात भर पाडली. त्यामुळे ई-लर्निंग हा उपाय निश्चितच शिक्षिणक्षेत्रात फायदेमंद ठरू शकतो.

Date of Online: 30 July 2020